IPL 2023: ‘याच्या हेल्मेटवर बॉल मार’, रोहित शर्माने स्ट्राइक बदलताच विराट कोहली ओरडला?, VIDEO व्हायरल

[ad_1]

IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामातही मुंबईने (Mumbai Indians) पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात (Royal Challengers Bangalore) झालेल्या सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला. विराट कोहली आणि फाफ ड्यूप्लेसिसने 148 धावांची भागीदारी करत एकहाती सामना जिंकून दिला. एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दरम्यान विराट कोहली आणि फाफ ड्यूप्लेसिसने पहिल्या विकेटसाठी 148 धावांची जबरदस्त भागीदारी केली. विराटने नाबाद 82 आणि फाफ ड्यूप्लेसिसने 73 धावा करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. 22 चेंडू राखत बंगळुरुने सहजपणे हा सामना जिंकला आणि आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण मुंबई इंडियन्सचे फलंदाज सपशेल अपयशी ठरत होते. पहिल्या नऊ ओव्हर्समध्ये संघाची स्थिती 48 धावांवर 4 गडी बाद होती. कर्णधार रोहित शर्माही यशस्वी खेळी करु शकला नाही. तो फक्त 10 धावांवर बाद झाला.

दरम्यान रोहित मैदानात खेळत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली आहे.

रोहित शर्माने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एक धाव काढली होती. दरम्यान, यावेळी बंगळुरुचा खेळाडू चेंडू हेल्मेटवर मार असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. “मार, हेल्मेटवर मार याच्या” असं खेळाडू बोल असल्याचं ऐकायला येत आहे.

काहींनी हा कोहलीचा आवाज असल्याचा दावा केला आहे. काहींना मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान खेळाडू नेमका कोणाच्या डोक्यावर चेंडू मारण्यास सांगत आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

मोहम्मद सिराजने या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना रोखलो होतं. मुंबईकडून तिलक वर्माने 84 धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. रोहित शर्मानेही त्याच्या खेळीचं कौतुक केलं.

बंगळुरु संघ गुरुवारी कोलकाचा नाइट रायडर्सशी भिडणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा शनिवारी चेन्नईशी सामना होणार आहे.

[ad_2]

Leave a Comment