रोहितला कोणी दिली होती धमकी?

[ad_1]

Rohit Sharma : क्रिकेटमध्ये आता रोहित शर्मा (Rohit Sharma) हे नाव केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील अनेकांना परिचयाचं झालं आहे. नुकतंच टीम इंडियाचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने रोहितबाबत एक मोठा खुलासा केला होता. यावेळी मोठं नाव कमावण्यासाठी रोहितला किती अडचणींचा सामना करावा लागला होता, याबबात खुलासा केला. तर आता एक इंटरव्यूच्या माध्यमातून रोहित शर्माला धमकी (Rohit Sharma threat) मिळाली असल्याचाही मोठा खुलासा झाला आहे.

रोहितला कोणी दिली होती धमकी?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला त्याची पत्नी रितीकाबाबत ही धमकी मिळाली होती. हिटमॅनला ही धमकी, दुसरं तिसरं कोणीही नाही तर टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने दिली होती.

ही गोष्ट रोहित शर्माच्या लग्नापूर्वीची आहे. मुळात रितीका सजदेहला युवराज मानलेली बहिण मानतो. लग्नापूर्वी युवराज सिंगने रोहितला आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी दिली होती. मात्र त्यानंतर रोहित शर्माने 2015 साली रितीका सहदेह सोबत लग्नगाठ बांधली होती.

हिटमॅनने स्वतः केला खुलासा

एक यूट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स’यामध्ये हा खुलासा केला होता. यामध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, माझी आणि रितिकाची भेट एका शूटिंगदरम्यान झाली. मुख्य म्हणजे युवराज सिंग देखील उपस्थित होता. त्यावेळी युवराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, ती माझी बहीण आहे…तिच्यापासून दूर राहा.

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने दिलेल्या धमकीनंतरही रोहित शर्माने रितिकाशी मैत्री केली. यानंतर दोघांनी एकमेकांनी डेटिंग केलं. या दोघांनी जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्याची माहिती आहे. 6 वर्षांच्या डेटिंगनंतर रोहित शर्माने रितिकाला एका खास पद्धतीने प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. रोहितने रितिकाला प्रपोज केलं. अखेर 2015 साली दोघंही लग्नबंधनात अडकले.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी 3 जून 2015 मध्ये साखरपुडा केला. तर डिसेंबर 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. रोहित आणि रितिका यांचा विवाह ताज लँड्स हॉटेलमध्ये झाला होता. त्यांच्या या शाही लग्नसोहळ्याला क्रिकेटर आणि बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

[ad_2]

Leave a Comment