IPL 2023 : मराठमोळ्या खेळाडूमुळं हार्दिक पांड्याचं करिअर धोक्यात?

[ad_1]

IPL 2023 News : गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट (indian Cricket team) जगतात अनेक नवख्या खेळाडूंनी त्यांची दमदार खेळी दाखवून दिली. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये काही खेळाडू खऱ्या अर्थानं चमकले. तर, काही खेळाडूंनी निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला. वर्षभरात क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंच्या यादीतील सध्या एका अशा नावाची चर्चा सुरु आहे, ज्याच्यामुळं थेट हार्दिक पांड्याच्याच क्रिकेट कारकिर्दीला धोका असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सध्याच्या घडीला हा खेळाडू त्याच्या दमदार खेळीनं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा विश्वास जिंकताना दिसत आहे. हा खेळाडू इतका घातक ठरू शकतो, की येत्या काळात विरोधी संघातील खेळाडूंच्याही नाकी आणू शकतो अशीच त्याची खेळी दिवसागणिक आणखी प्रभावी होताना दिसत आहे.

2023 च्या विश्वचषकादरम्यानही भारतीय संघात महत्त्वाची भूमिका निभावणारा हा खेळाडू आहे, शार्दुल ठाकूर. मराठमोळा शार्दुल सध्या त्याच्या आयपीएलमधील प्रभावी शैलीमुळं चर्चेत आला आहे.  नुकत्याच झालेल्या सामन्यात त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघातील गोलंदाजांना घाम फोडला होता. अवघ्या 29 चेंडूंमध्ये त्यानं 68 धावा ठोकत सर्वांच्याच नजरा वळवल्या.

कोलकाता संघाला शार्दुलनं तारलं… 

11.3 षटकांमध्ये 89 धावा करत कोलकात्याच्या (KKR) संघानं 5 गडी गमावले होते. संघ 120 धावांवरच गाशा गुंडळतो की काय असं वाटत असतानाच सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यानं 29 चेंडूंचा सामना करत 68 धावांच्या वादळी खेळीचं प्रदर्शन करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. त्याच्या या खेळामुळं कोलकात्याचा संघ तबब्ल 81 धावांनी विजयी होऊ शकला. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आलं.

शार्दुलची ही खेळी पाहता सध्या आयपीएलमधील (IPL) त्याची आकडेवारी टीम इंडियातील त्याचं स्थान अधिक भक्कम करु पाहत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. किंबहुना त्याच्यामुळं (Hardik Pandya) हार्दिक पांड्याच्या करिअरला धोका असू शकतो असंही काहींचं म्हणणं. तेव्हा आता हार्दिक आणि शार्दुलमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली तर, यात आश्चर्य वाटायला नको.

शार्दुलची  आतापर्यंतची आकडेवारी… 

अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल येत्या काळात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांधून भारतीय संघात दिसू शकतो. हार्दिकचं सांगावं, तर सध्या तो एकदिवसीय आणि टी20 मध्येच आपली छाप उमटवू शकला आहे. अशा परिस्थितीत शार्दुल त्याला मागे टाकून सहज पुढे जाऊ शकतो असंच अनेकांचं मत. तुम्हाला काय वाटतं?

[ad_2]

Leave a Comment