‘…म्हणून यल्लो ड्रेस का?’; ऋतुराजचं अर्धशतक अन् सायली संजीवची पोस्ट, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

[ad_1]

मुंबई, 04 एप्रिल: ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव सध्या तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सायली संजीवचं कौतुक होतंय.  सायलीच्या अभिनयामुळे ती चर्चेत असतेच पण क्रिकेटमुळे देखील सायली सतत लाइमलाइटमध्ये येत असते. क्रिकेटर ऋतुराज गायकवाडबरोबर सायली संजीवचं नाव जोडलं जातं.  सायली संजीव सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या ती तिच्या नव्या प्रोजेक्टवर काम करतेय. नुकतेच तिनं तिचे फोटो शेअर केलेत. जे पाहून नेटकऱ्यांनी तिला ऋतुराजविषयी प्रश्न विचारत चांगलीच फिरकी घेतली आहे.  यानिमित्तानं सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाडच्या अफेअर्सच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.

याआधी अनेक वेळा अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांचं नाव जोडण्यात आलं होतं. दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा देखील होत्या. पण यंदाच्या आयपीएलची सुरूवात होताच दोघे पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आहेत. नुकताच चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएट्स असा आयपीएल 2023चा सहावा सामना रंगला. याच चेन्नई सुपरकिंगचा विजय झाला.  या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं फोर वर फोर आणि सिक्स मारले. केवळ 25 बॉल्समध्ये 50 रन्स करत ऋतुराजनं मैदान मारलं.  सलग दोन दिवस ऋतुराजनं आपल्या खेळानं सर्वाचं लक्ष वेधलं.

एकीकडे ऋतुराज गायकवाडच्या उत्तम कामगिरीचं कौतुक होत असताना दुसरीकडे सायलीला तिच्या पोस्टवरून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रश्न विचारलेत. अभिनेत्री सायली संजीवनं ‘गुड मॉर्निंग’ असं कॅप्शन देत हातात कॉफी मग धरलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत सायलीनं पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला आहे. या कुर्त्यावरून सायली आणि ऋतुराजचा संबंध लावला जात आहे. ऋतुराज चेन्नई सुपरकिंगमधून खेळतोय. त्याच्या टीमचा रंग पिवळा आणि सायलीनं बरोबर ऋतुराजच्या हाफ सेंच्युरीनंतर पिवळ्या रंगाच्या कुर्त्यातील फोटो शेअर केलाय. पिवळ्या रंगाच्या कनेक्शनवरून सायलीला नेटकऱ्यांनी चांगलंच हेरलं आहे.

सायलीच्या पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीची फिरकी घेत एका युझरनं, “वाहिनी काल मॅच जिंकलो म्हणून यल्लो ड्रेस का?”, असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या युझरनं, “हम यल्लो” अशी कमेंट केली आहे.

अभिनेत्री सायलीनं काही दिवसांआधी तिच्या आणि ऋतुराजच्या अफेअर्सच्या चर्चांवर उत्तर देत म्हटलं होतं की, “मला क्रिकेट आवडतं. ऋतुराजचा खेळ आवडतो. पण त्याचा आणि माझा काही संबंध नाही. त्याचा फोन नंबरही माझ्याकडे नाही. आमच्याविषयी इतक्या चर्चा का होतात हे मला खरंच माहिती नाही”.

[ad_2]

Leave a Comment