ipl 2023 corona entry comentater aakash chopra covid test positive will not do commentary for few days

[ad_1]

Corona in IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. 31 मार्चला भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. आतापर्यंत सहा सामने खेळवले गेले आहेत. आयपीएलची (IPL 2023) रंगत हळूहळू वाढत असतानाच एक वाईट बातमी सममोर आली आहे. आयपीएल 2023 वर कोरोनाचं सावट पसरलंय. स्पर्धेतील एका दिग्गजाचा कोरोना (Corona) रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आला आहे. या दिग्गजाने स्वत: याची माहिती दिली आहे. आयपीएल 2021 स्पर्धा कोरोना महामारीमुळे मध्येच थांबवण्यात आली होती. त्यानंतर उर्वरीत सामने दुबईत खेळवण्यात आले होते.

या दिग्गजाला कोरोनाची लागण
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (IPL 2023) दरम्यान टीम इंडियााच माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोपडा याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आकाश चोपडाने (Aakash Chopra) स्वत: ही माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्याने आयपीएलमध्ये काही दिवस समालोचन करु शकत नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

आकाश चोपडा याने आपल्या युट्यूब चॅनलच्या कम्यूनिटी पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, व्यत्ययाबद्दल दिलगीर आहे. कोविडने पुन्हा एकदा स्ट्राईक केला आहे. काही दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. घसा दुखत असल्याने आवाजाचा लोचा झालाय, वाईट वाटून घेऊ नका, देवाचे आभार लक्षणं सौम्य आहेत. असं आकाश चोपडाने म्हटलंय.

आकाश चोपडाची क्रिकेट कारकिर्द
आकाश चोपडाने ऑक्टोबर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच आकाश चोपडाने दमदार कामगिरी केली होती. कसोटी सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने 73 धावा केल्या. पण यानंतर त्याच्या खेळाला ओहोटी लागली. आकाश चोपडा केवळ 10 कसोटी सामना खेळला. यात त्याने 437 धावा केल्या. कसोटी क्रिकेटशिवाय तो एकही एकदिवसीय किंवा टी20 क्रिकेट खेळू शकला नाही.

[ad_2]

Leave a Comment