* 1. फळांचे वेगळे वेगळे आकार करून गमतीशीर पद्धतीने खाऊ घालणे. स्टार, Circle Shape पाहून मुलांना गंम्मत तर वाटते पण माझं फळ कस वेगळ आहे म्हणून खाण्याची इच्छा होते.
* 2. फळांची शॉपिंग मुलांना घेऊन करणे त्यांना त्याचे मत विचारणे. ह्यामुळे मुलांना तुम्ही चॉईस देताय विचारताय ह्याच अप्रूप वाटत आणि मग हे तू विकत घेतल आहे अस सांगितल की confidence मुलांमध्ये येतो.
* 3. घरातल्या सगळ्यांनी एकत्र फ्रूट पार्टी करा आणि असे वारंवार करा. तुम्हाला खाताना पाहून मुलांना सुद्धा खायची नक्की इच्छा होईल.
* 4. फळ खाताना मुलांच कौतुक करा. ते शरीरासाठी कसे महत्वाचे आहे ते सांगा पण खाण्याचा अति आग्रह करू नका. कौतुक केलेली गोष्ट कोणाला हवीहवीशी वाटत नाही. मुलांना तर अधिक गंम्मत वाटत राहते.
* 5. जवळच पेरूची बाग किंवा कोणत्या ही फळाची शेती असेल तर आवर्जून फळ तोडून खायला दया . ज्याने मुलांना गंम्मत वाटेल. शेतातली गंम्मत, झाडाखाली बसून खाणे,खेळणे ह्यामुळे मुलांना नवीन काहीतरी दिसते आणि गंम्मत म्हणून फळाची चव घेतली जाते.
* 6. नेहमी तीच तीच फळ न देता वेगवेगळी द्या. तेच तेच खाऊन मोठी माणसं पण कंटाळा करतात. Season नुसार रोज एक वेगळ फळ द्या जेणेकरून खाण्यात नावीन्य पण राहते आणी खाण्याची इच्छा पण होते.
* 7. कच्ची किंवा खूप जुनी फळ देणे टाळावे कारण त्याने चव नीट नसेल तर ते फळ नवडते होऊ शकत. बेचव किंवा खराब चवीमुळे मुलांचे मत हे फळ असेच असते अस होऊ शकत.
* 8. ही प्रक्रिया वारंवार करण्याची आहे एकदा किंवा दोनदा नाही. हे सगळं अनेक वर्ष नियमित कराव लागत जेणेकरून खाण्याबदल ची आवड निर्माण होईल .