Suryakumar yadav:”सूर्यकुमार हा अँड्र्यू सायमंड्ससारखा, खराब फॉर्ममध्ये…”, बड्या खेळाडूने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला!

[ad_1]

Ricky Ponting On Suryakumar yadav: येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सर्वकाही सेट होत असताना टीम इंडियामध्ये 4 नंबरच्या पोझिशनला कोण खेळणार यावर चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचा स्टार टी-ट्वेंटी फलंदाज सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये खास कामगिरी करता आली नाही. मागील वनडे मालिकेत सलग तिन्ही सामन्यात एकही रन काढला आला नाही. त्यामुळे आता सूर्यकुमारला वनडे वर्ल्ड कपमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग याने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Ricky Ponting?

मला वाटतं की टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवसोबत राहावं, तो असा खेळाडू आहे जो तुम्हाला विश्वचषक जिंकून देऊ शकतो, सध्या तो खराब फॉर्ममध्ये असला तरी मोठ्या सामन्यांमध्ये तो तुमची गुरुकिल्ली ठरू शकतो, असा विश्वास रिकी पॉंटिंगने (Ricky Ponting On Suryakumar yadav) व्यक्त केला आहे.

सूर्यकुमार यादव हा अँड्र्यू सायमंड्ससारखा (Andrew Symonds) आहे, त्याने सुरुवातीला संघर्ष केला, परंतु जेव्हा त्याला सातत्यपूर्ण संधी मिळाल्या तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याचप्रमाणे सूर्याही टीम इंडियासाठी चमत्कार करू शकतो, त्यामुळे त्याला वनडेमध्ये संधी द्यावी, असंही रिकी पाँटिंग (Ricky Ponting On Suryakumar yadav) म्हणाला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात सूर्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता आगामी सामन्यात सूर्या आपल्या रुद्र अवतारात कमबॅक करेल, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत. सूर्याला वनडेमध्ये फेल जात असला तरी टी-ट्वेंटीमध्ये त्याचा धमाकाचा सुरूच राहिल, असं म्हटलं जातंय. तर युवा साई सुदर्शनच्या नावाचा आगामी वर्ल्ड कपसाठी वापर करावा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीये.

[ad_2]

Leave a Comment