Pregnancy मध्ये “हॉटेल च अन्न खाताय” मग !! सावधान !!

Pregnancy मध्ये “हॉटेल च अन्न खाताय” मग !! सावधान !!

Pregnancy Tips In Marathi
Pregnancy Tips In Marathi

 

Pregnancy मध्ये तुम्हांला मसाला डोसा बिर्याणी, बर्गर, पिझ्झा ,सोडा ,चाट, खायचे “डोहाळे” लागलेत? प्रत्येक वेळेला अस काही खायची इच्छा झाली तर तुम्ही ते बाहेर हॉटेल मध्ये जाऊन खाताय तर “इथेच थांबा”.

तुम्हाला माहितीये किंवा ही guarantee आहे की तुम्ही खाताय ते अन्न “स्वच्छ आणि ताज आहे”? “तुम्ही खात असलेल्या अन्नामध्ये तेलाचा उपयोग नीट केला आहे”? खूप जुन आणि frozen अन्न नाही?

बाहेर बनवलेल्या अन्ना पदार्थांमध्ये खूप प्रमाणात

फूड कलर्स (food colours)

प्रेसेव्र्व्हटिव्हस (preservatives)

फ्रोज़न फूड (frozen food)

आणि अस बरच काही वापरल जात.

हे सगळे घटक शरीरासाठी घातक तर आहेतच पण शरीरात खूप प्रमाणात सोडियम (sodium) ची लेवल वाढवतो. हाई saturated fats असल्यामुळे cholesterol वाढवून blood pressure, हृदय विकार वाढण्याची शक्यता अधिक असते. साखरेच्या अति प्रमाणामुळे किंवा अतिसेवानमुळे शरीरातील साखर सुद्धा वाढू शकते.

फूड colours चे तर खूप भयानक तोटे आहेत.

Preservatives चा अति वापर केल्यामुळे पण खूप त्रास होतो.

खराब तेल, फ्रोझन अन्न जसे की फळ आणी भाज्या जर खूप जुन्या असतील आणी नीट ठेवले नसतील, तर त्यावर खराब होण्याची प्रोसेस होऊन bacteria, yeast, moulds ची वाढ होऊन शरीराला खूप घातक ठरवू शकत.

✓ माझ्या मते कितीही इच्छा झाली तरी बाहेरचे अन्न टाळावेच किंवा क्वचितच खावे.

✓ तर पुढच्यावेळी बाहेर खायची इच्छा झाली तर हेच अन्न पौष्टिकरित्या साफ आणी स्वच्छ वातावरणात बनवू शकता म्हणजेच घरी.

✓ घरचे तेल तुपाचे प्रमाण आणी तुम्ही जे घटक वापरताय ते ताज आणी स्वच्छ आहे ह्याची शहानिशा करून वापरू शकता आणी प्रमाणात का होईना त्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की मी घरी बनवून नेहमीच पिझ्झा, बर्गर खातीये.

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्की share करा.

 

Leave a Comment