IPL 2023: IPL सुरु होताच दुसऱ्या सामन्यावर संकट? पंजाब किंग्ज आणि KKR मधील सामना होणार रद्द?

[ad_1]

Punjab Kings vs Kolkata Knight Riders: सर्वांचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. दिमाखदार सोहळ्यासह या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धा सुरु होताच दुसरा सामना रद्द होण्याचं संकट निर्माण झालं आहे. आज दुपारी 3.30 वाजता पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी पीसीएए स्टेडिअम सज्ज आहे. दोन्ही संघही या सामन्यासाठी तयार आहेत. मात्र यादरम्यान एक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते.

सामना रद्द होणार? 

मोहालीमध्ये आयपीएलमधील दुसरा सामना होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं संकट आहे. पावसामुळे पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान होणारा सामना रद्द होऊ शकतो. हवामान विभागानेच पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 1 एप्रिलला संपूर्ण पंजाब राज्यात पावसाचा आणि वादळाची शक्यता आहे. हवामान विभागाचा खरा ठरल्यास पंजाब आणि कोलकातामधील सामन्याला फटका बसू शकतो.

सध्याच्या हंगामात शिखर धवनच्या हाती पंजाब किंग्जचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. गेल्या हंगामात मयांक अग्रवालच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करु न शकल्यामुळे शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आलं होतं. दुसरीकडे नितीश राणाकडे कोलकाता नाइट रायडर्सचं कर्णधारपद आहे. श्रेयस अय्यर जखमी झाला असल्याने नितीश राणाकडे नेतृत्व सोपवण्यात आलं असून, त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

कसे असतील दोन्ही संघ?

पंजाब किंग्स: 

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), राज अंगद बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंग्स्टन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, बलतेज सिंग, सॅम करण, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वत कविरप्पा, शिवम सिंग, मोहित राठी.

कोलकाता नाइट रायडर्स:

नितीश राणा (अंतरिम कर्णधार), श्रेयस अय्यर (नियमित कर्णधार), एन जगदीशन, रिंकू सिंग, मनदीप सिंग, लिटन दास, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, डेव्हिड विसे, अनुकुल रॉय, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, व्यंकटेश अय्यर, शकीब अल हसन, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी, वैभव अरोरा, कुलवंत खेजरोलिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

[ad_2]

Leave a Comment