मुंबई-चेन्नईत हाय व्होल्टेज सामना, रोहित या Playing XI सह मैदानात उतरणार!

[ad_1]

मुंबई, 7 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. आयपीएलमधल्या सगळ्यात यशस्वी दोन टीममधल्या या सामन्याचा रोमांच चाहत्यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाहता येणार आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर चेन्नईने आतापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत, यातल्या एका मॅचमध्ये त्यांचा विजय तर दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सहाव्या क्रमांकावर आणि मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईच्या टीमच्या बॉलिंगला संघर्ष करावा लागला आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या बॅटर आणि बॉलरनी निराशा केली. तिलक वर्मा वगळता मुंबईच्या एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही, तर बॉलरनाही यश मिळालं नाही. दुसरीकडे चेन्नईच्या बॉलिंगमध्येही आक्रमकपणाची कमी जाणवली आहे.

 

मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये आतापर्यंत 36 मॅच झाल्या आहेत, यातल्या 21 सामन्यांमध्ये मुंबईचा तर 15 सामन्यांमध्ये चेन्नईचा विजय झाला आहे. आयपीएलचा मागचा मोसमही या दोन्ही टीमसाठी चांगला राहिला नव्हता. मुंबई आणि चेन्नईच्या टीम शनिवारच्या सामन्यात त्यांचे दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड आणि ड्वॅन ब्राव्हो यांच्याशिवाय उतरणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या टीमना ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे दोन्ही टीम टॉसनंतरच त्यांच्या टीमची घोषणा करणार आहेत. पण मुंबई या सामन्यात टीममध्ये एक बदल करून खेळण्याची शक्यता आहे. लेग स्पिनर असलेल्या पियुष चावलाऐवजी कुमार कार्तिकेयला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनऐवजी मुंबईने ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर रिले मेरेडिथला टीममध्ये घेतलं आहे, पण मेरेडिथ अजून मुंबईच्या टीममध्ये दाखल झाला का नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

मुंबईची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, नेहल वधेरा, टीम डेव्हिड, ऋतिक शौकीन, अर्शद खान, कुमार कार्तिकेय/पियुष चावला, जोफ्रा आर्चर

(इम्पॅक्ट प्लेअर- जेसन बेहरनडॉर्फ)

चेन्नईची संभाव्य टीम

डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सिसांदा मगाला/मिचेल सॅन्टनर, राजवर्धन हंगर्गेकर, दीपक चहर

(इम्पॅक्ट प्लेअर- तुषार देशपांडे)

[ad_2]

Leave a Comment