स्मृती मानधना संदर्भात प्रश्न विचारताच विराटच्या तोंडून निघाली शिवी, Video Viral

[ad_1]

मुंबई, 4 एप्रिल : सध्या देशभरात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने पहिल्याच सामन्यात मुंबई विरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली. अशातच आरसीबीकडून विराट कोहलीची एक मुलाखत घेण्यात आली. यादरम्यान महिला क्रिकेटर स्मृती मानधनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहलीच्या तोंडून शिवी निघाली.

आरसीबीने मुंबई विरुद्ध आयपीएल 2023 मधील पहिला सामना जिंकल्यावर संपूर्ण आरसीबीने टीमने जंगी सेलिब्रेशन केले. अशातच आयपीएल 2023 च्या निमित्ताने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून विराट कोहली ची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मिस्टर नॅग्स यांनी विविध प्रश्न विचारून विराटला बोलते केले. यावेळी विराटने आरसीबी आणि आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मिस्टर नॅग्सने विचारलेल्या एका प्रश्नावर विराटच्या तोंडून अपशब्द निघाले.

 

[ad_2]

Leave a Comment

Exit mobile version